Ladki bahin : 10 लाखाहून अधिक महिला योजनेतून वगळल्या, या कारनामुळे
लाडकी बहीण योजना, महाराष्ट्रातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेचा लाभ १८ ते ६५ वयोगटातील, अडीच लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील महिलांना दिला जातो. मात्र योजनेसाठी अर्ज करताना अनेक अर्जदारांनी अटींचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले आहे.ज्यामुळे अनेक महिलांना मिळणारा लाभ थांबवण्यात आला आहे…
जवळपास 10 लाखाहून अधिक महिलांनी हप्ता न मिळाल्याची तक्रार केली आहे तर तक्रार न केलेल्या आणि हप्ता जमा न झालेल्या अनेक महिला आसू शकतात.
Ladki bahin हप्ता बंद कशामुळे झाला ?
लाडकी बहीण योजनेसाठी खालील प्रमुख अटी व शर्ती आहेत, त्यामध्ये १८ ते ६५ वयोगटातील महिलांनाच या योजनेचा लाभ मिळतो…कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आसेल तरंच लाभ मिळतो….एका कुटुंबातील केवळ दोन महिलांनाच या योजनेचा लाभ मिळू शकतो….कुटुंबाकडे चारचाकी वाहन नसायला पाहिजे..लाभार्थी महिला इतर कोणत्याही सरकारी वैयक्तिक योजनेचा लाभ घेतलेली नसावी….
मात्र काही कुटुंबांमधून दोनपेक्षा जास्त महिला योजनेचाज लाभ घेत आहेत तर काही अर्जदारांनी आधारकार्डवरील जन्मतारीख बदलून १८ वर्षांपेक्षा कमी वय असतानाही १८ पूर्ण झाल्याचे दाखवून लाभ घेतला आहे..काही महिलांनी कुटुंबाकडे चारचाकी वाहन असताना किंवा वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असतानाही खोटी माहिती सादर करून लाभ मिळवला आहे अशा सर्व महिलांना योजनेतून वगळण्यात आले आहे आणि यापुढेही पडताळणी चालू आहे त्यामुळे अजुनही अनेक महिला योजनेतून अपात्र ठरवन्यात येनार आहेत.
आता ६५ वर्षे पूर्ण झालेल्या महिलांचा लाभ आपोआप बंद होत आहेत, एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिलांचा लाभ बंद करण्यात आला असून, त्यांच्या नावापुढे ‘एफएससी मल्टिपल इन फॅमिली’ असा शेरा मारण्यात आला आहे. तर ज्या कुटुंबांकडे चारचाकी वाहन आहे, त्यांच्यासाठी ‘आरटीओ रिजेक्टेड’ असा शेरा दिला जात आहे… इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी ‘अदर स्कीम बेनिफिशियरी’ असे शेरे दिले जात आहेत….
पुढील महिन्यात या महिला होनार अपात्र…
ऑगस्ट महिन्यापासून कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असलेल्या महिलांची पडताळणी केली जाणार आहे. प्राप्तिकर विभागाने महिला व बालविकास विभागाला दिलेल्या माहितीच्या आधारे ही पडताळणी प्रक्रिया पूर्ण केली जाईल. यामुळे आनखी अपात्र लाभार्थींना योजनेतून वगळण्यास येनार आहे.
पात्र आसूनही लाभ बंद झाला,अशी करा तक्रार
पात्र आसुनही लाभ बंद झालेल्या महिलांसाठी तक्रार नोंदवण्यासाठी विशिष्ट यंत्रणा उपलब्ध करून दिली आहे.योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर ‘ग्रिव्हन्स’ हा पर्याय उपलब्ध आहे. अर्जदार स्वतःचा लॉगिन आयडी तयार करून यावर ऑनलाइन तक्रार करू शकतात. याव्यतिरिक्त, महिला व बालविकास कार्यालयात किंवा तालुक्यातील बालविकास प्रकल्प कार्यालयांमध्ये ऑफलाइन अर्ज सादर करू शकतात.