Ladki bahin yojana ; या लाडक्या बहीणींना जुनचा हप्ता मिळनार नाही…

Ladki bahin yojana ; या लाडक्या बहीणींना जुनचा हप्ता मिळनार नाही…

लाडकी बहीन योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे.. योजनेतून अपात्र महीलांना बाद करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे आणि अनेक महिलांना अपात्र ठरवन्यात आले आहे. अजूनही अपात्र महिलांची पडताळणी सुरू आहे त्यामुळे अनेक महिलांचा लाभ बंद होनार आहे. तर कोणत्या महिलांना अपात्र ठरवले जानार आहे सविस्तर पाहू…

 

Crop lone ; शेतकऱ्यांना पिककर्ज मिळनार – सविस्तर पाहू

Ladki bahin yojana ; काही कुटुंबांमधून दोनपेक्षा जास्त महिलांनी योजनेचा लाभ घेतला आहे. तर काही अर्जदारांनी आधारकार्डवरील जन्मतारीख बदलून १८ वर्षांपेक्षा कमी वय असतानाही १८ पूर्ण झाल्याचे दाखवून लाभ घेतला आहे. याशिवाय, काही महिलांनी कुटुंबाकडे चारचाकी वाहन असताना किंवा वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असतानाही खोटी माहिती सादर करून लाभ मिळवला आहे. अशा सर्व महिलांना योजनेतून वगळण्यात आले आहे आणि सध्या पडताळणी सुरू असल्यामुळे अजूनही अनेक महिला या योजनेतून अपात्र ठरवण्यात येणार आहेत.

 

Ladki bahin yojana पुढील महिन्यात या महिला होणार अपात्र

ऑगस्ट महिन्यापासून कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असलेल्या महिलांची पडताळणी केली जाणार आहे. प्राप्तिकर विभागाने महिला व बालविकास विभागाला दिलेल्या माहितीच्या आधारे ही पडताळणी प्रक्रिया पूर्ण केली जाईल. यामुळे अजूनही अनेक अपात्र लाभार्थींना योजनेतून वगळण्यात येणार आहे.

 

या महिलांना योजनेतून वगळले..

एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिलांचा लाभ बंद करण्यात आला असून, त्यांच्या नावापुढे एफएससी मल्टिपल इन फॅमिली असा शेरा मारण्यात आला आहे.ज्या कुटुंबांकडे चारचाकी वाहन आहे, त्यांच्यासाठी आरटीओ रिजेक्टेड असा शेरा दिला जात आहे… इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी ‘अदर स्कीम बेनिफिशिअरी’ असे शेरे दिले जात आहेत.

 

पात्र असूनही लाभ बंद झाला असल्यास, अशी करा तक्रार

जर तुम्ही पात्र असूनही तुमचा लाभाचा हप्ता बंद झाला असेल, तर त्यासाठी तक्रार नोंदवण्यासाठी विशिष्ट यंत्रणा उपलब्ध करून दिली आहे. योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर ग्रिव्हन्स हा पर्याय उपलब्ध आहे. अर्जदार स्वतःचा लॉगिन आयडी तयार करून यावर ऑनलाइन तक्रार करू शकतात. याव्यतिरिक्त, तुम्ही महिला व बालविकास कार्यालयात किंवा तालुक्यातील बालविकास प्रकल्प कार्यालयांमध्ये ऑफलाइन अर्ज सादर करू शकता.

Havaman andaj today ; आज या जिल्ह्यात मुसळधार पाऊस, IMD

Leave a Comment