Havaman andaj 23 july ; आज या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा ईशारा

Havaman andaj 23 july ; आज या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा ईशारा

पुढील काही तासात राज्यातील बहुतांश भागात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवला आहे.. कोकण आणि विदर्भ, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा ईशारा हवामान खात्याने दिला आहे…

आज कोणत्या जिल्ह्यासाठी कोणता अलर्ट आहे, कुठे मुसळधार तर कुठे हलक्या पावसाची शक्यता आहे पाहुयात सविस्तर👇👇

 

Havaman andaj 23 july ; आज या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा ईशारा

 

विदर्भ ; अमरावती, वर्धा,यवतमाळ, चंद्रपुर आणि गडचिरोली या जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवन्यात आलाय तर नागपूर, भंडारा, गोंदिया, बुलढाणा अकोला आणि वाशीम या जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाचा यल्लो अलर्ट देण्यात आला आहे.

 

मराठवाडा ; नांदेड, लातूर, बिड, परभणी, हिंगोली, जालना, संभाजीनगर या जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम तर धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

 

मध्य महाराष्ट्र (उत्तर/मध्य/दक्षिण) ; नाशिक, धुळे, नंदुरबार जळगाव तूरळक ठिकाणी मध्यम पावसाचा यल्लो अलर्ट तर पुणे, सातारा कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा आँरेंज अलर्ट आहे.
अहिल्यानगर तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम, तर सोलापूर आणि सांगली कोणताही अलर्ट नाही…

 

कोकण ; रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा आँरेंज अलर्ट तर मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यात मुसळधारेचा यल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Havaman andaj 23 july ; आज या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा ईशारा

Leave a Comment