Ladki bahin update ; लाडक्या बहीनींचे पैसे जमा होनार, मोठा निर्णय

Ladki bahin update ; लाडक्या बहीनींचे पैसे जमा होनार, मोठा निर्णय

राज्यात शेतकरी योजना, सरकारी कर्मचारी आणि अडिच लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्या महिलांना या योजनेतून कमी करण्यास सुरूवात झाली आहे. विविध मार्गाने राज्यातील 50 लाख लाडक्या बहिणी या योजनेतून कमी केल्या जातील असा आरोप आधिक विरोधकांनी केला होता. ते आता खरा ठरताना दिसत आहे.

 

सरकारने गेल्या महिन्यात (जून) 2.30 लाख संजय गांधी निराधार योजना, 1.10 लाख 65 वर्षांहून अधिक वय असल्याने महिला, 1.60 लाख चारचाकी वाहनं असलेव्या महिला, नमो शेतकरी योजनेच्या 7.70 लाख महिला, सरकारी सेवेतील 2,652 महिला अशा 12 लाख 72, 652 महिला आपात्र ठरवण्यात आल्या आहेत. तर आतापर्यंत जवळपास 19 लाखांहून अधिक लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत. यामुळे महिलांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

 

यातच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. दरम्यान विरोधकांकडून या योजनेतून केली जाणारी लाडक्या बहिणींच्या गळतीचा राजकीय मुद्दा केला जाऊ शकतो. तसेच महिलांच्या नाराजीचा फटका आगामी स्थानिकमध्ये बसू नये म्हणून सरकारने मोठा निर्णय घेतला आहे…

 

Ladki bahin update ; लाडक्या बहीनींचे पैसे जमा होनार, मोठा निर्णय

 

सरकारने सुरू केलेली पडताळणी सद्यःस्थितीत थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच निवडणुका संपेपर्यंत नोंदणी केलेल्या सर्व महिलांना लाभ दिला जाणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे लाडकी बहीण योजनेतील सध्या लाभ घेणाऱ्या महिलांना दिलासा मिळाला आहे. तसेच ज्या लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता मिळाला नाही. त्यांना तो या महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा ऑगस्ट महिन्याच्या 5 तारखेपर्यंत दिला जाणार आहे.

Leave a Comment