महसूल मंत्र्यांचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, पहा काय फायदा होनार

महसूल मंत्र्यांचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, पहा काय फायदा होनार

राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, आता कलेक्टरपासून तलाठ्यांपर्यंत सर्व अधिकाऱ्यांना त्यांच्या नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रात हजर राहून फेस ॲप (Face App) द्वारे हजेरी लावावी लागणार आहे…

शेतकऱ्यांना काय फायदा ?

शासनाच्या अनेक योजना आणि उपक्रम कागदावरच राहतात आणि त्यांची योग्य अंमलबजावणी होत नाही. कृषी सहायक, ग्राम विकास अधिकारी आणि तलाठी यांसारख्या अधिकाऱ्यांची कार्यक्षेत्रात उपस्थिती नसल्यामुळे शेतकऱ्यांपर्यंत अनेक योजना पोहोचत नाहीत. अधिकारी आपल्या कार्यक्षेत्रात उपस्थित नसल्यामुळे शेतकरी आणि त्यांच्यामध्ये संपर्क होत नाही, परिणामी शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या सुविधा मिळत नाही. मात्र आता अधिकारी उपस्थित राहनार आसल्यामुळे शेतकऱ्यांची कामे वेळेवर व्हायला मदत होनार आहे.

आगदी खासगी कंपन्यांमध्ये आणि कारखान्यांमध्येही फेस ॲपद्वारे हजेरी लावणे बंधनकारक आहे. त्याच धर्तीवर सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त आणि जबाबदारी आणण्यासाठी हा निर्णय गरजेचा होता.या निर्णयामुळे आधीकारी लोकांना हजेरी लावावीच लागनार आहे.

या निर्णयामुळे आता तलाठी आणि इतर अधिकारी आपल्या कार्यक्षेत्रात उपस्थित राहतील, ज्यामुळे शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिक यांच्यात चांगला संपर्क साधला जाईल. यामुळे विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी होईल आणि शेतकऱ्यांची कामे वेळेवर पूर्ण होण्यास मदत होईल, ज्यामुळे त्यांना मोठा फायदा मिळनार आहे.

Leave a Comment