मानिकराव खुळे हवामान अंदाज ; राज्यात पावसाचा जोर एवढे दिवस

मानिकराव खुळे हवामान अंदाज ; राज्यात पावसाचा जोर एवढे दिवस

मानिकराव खुळे यांनी दिलेला पुढील ८ दिवसांचा सविस्तर हवामान अंदाज आपण या पोष्टमध्ये पाहनार आहोत. या आठवड्यात पाऊस कसा राहील, पाऊस नसलेल्या भागात पाऊस कधी याबाबत मानीकराव खुळे यांनी दिलेला अंदाज👇

 

पुढील ८ दिवस चांगला पाऊस

मानिकराव खुळे यांच्या अंदाजानुसार, २४ जुलैपासून महाराष्ट्रात पुन्हा चांगला पाऊस पडण्याची सुरू होनार आहे. जुलै महिन्याची सरासरी भरून काढण्यासाठी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हा पाऊस महत्त्वाचा ठरेल अशी माहिती मानीकराव खुळे यांनी दिली आहे.

 

या लाडक्या बहीणींना जुनचा हप्ता मिळनार नाही – येथे पहा

पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि नागपूरच्या काही भागात चांगला पाऊस झाला असला तरी, बुलढाणा, अमरावती, वाशिम तसेच मराठवाड्यातील हिंगोली, परभणी आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये अजूनही चांगल्या पावसाची गरज आहे. नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागातील नागाव, निफाड, दिंडोरीचा काही भाग, सिन्नर, येवला सोबतच संपूर्ण अहमदनगर जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि धाराशिव या जिल्ह्यातील काही भाग तसेच दक्षिण महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याचा काही भाग, पुणे जिल्ह्याचा पूर्व भाग, सांगलीचा काही भाग आणि सोलापूर जिल्ह्याचा पश्चिम भाग या ठिकाणी पावसाची कमतरता असून, त्यामुळे पिके धोक्यात आली आहेत.

 

पुढील ८ दिवस महाराष्ट्रात पाऊस वाढेल – मानिकराव खुळे

ज्या भागांमध्ये पावसाची उघडीप आहे ,पुढील ८ दिवस चांगला पाऊस पडेल आणि या पावसामुळे पिकांना जीवदान मिळेल असे खुळे यांनी सांगितले आहे.

या लाडक्या बहीणींना जुनचा हप्ता मिळनार नाही – येथे पहा

 

मानिकराव खुळे ; 24 जूलैपासून पाऊस वाढनार

सध्या मान्सून ट्रफ हिमालयाच्या पायथ्याशी (उत्तर प्रदेश, बिहार, जमशेदपूर) असल्याने महाराष्ट्रात पाऊस कमी आहे. परंतु, बंगालच्या उपसागरात २४ जुलै रोजी कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने मान्सून ट्रफ दक्षिणेकडे सरकेल आणि महाराष्ट्रात पाऊस वाढेल. तसेच, अरबी समुद्रातून येणारे मान्सूनचे वारे बळकट झाल्यामुळेही पावसाचे प्रमाण वाढण्यास मदत होईल असा अंदाज मानीकराव खुळे यांनी दिला आहे.

Ladki bahin yojana ; या लाडक्या बहीणींना जुनचा हप्ता मिळनार नाही…

Leave a Comment